उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे

उत्तरदायित्वास नकार

या पोर्टलवर विविध विभागांच्या अखत्यारीतील संकेतस्थळांची माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी महाराष्ट्र शासन स्वीकारीत नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती / संभ्रमासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाशी/अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.

हायपरलिंकिंग बाबतचे धोरण

बाह्य संकेतस्थळे/ पोर्टल्ससाठी जोडणी (लिंक)

संकेत स्थळावर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेत स्थळे/ पोर्टल्स यांच्या जोडण्या दिसतील. यांची निर्मिती आणि देखभाल अशासकीय/ खाजगी संघटनेमार्फत केली जाते. या जोडण्या तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य जोडणीची निवड करता, तेव्हा तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावरून बाहेर पडता. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण ‘त्या' बाह्य जोडणीच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते. या बाह्य संकेतस्थळाची माहिती आणि विश्र्वसनीयता यासाठी महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार नाही. त्यात तुम्ही व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. या संकेतस्थळावर उपलब्ध जोडण्या आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरू नका.

इतर संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे महाराष्ट्र शासनच्या संकेत स्थळाशी लिंक

अन्य संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळाची जोडणी – तुम्ही आमच्या संकेत स्थळावरील माहितीची जोडणी देऊ इच्छीत असाल, तर त्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेत स्थळाच्या चौकटीमध्ये आमचे पृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या संकेत स्थळावरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडायला हवी.

अटी आणि शर्ती

या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती महाराष्ट्र शासनाने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका.

संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा.

या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार नाही.

या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन "माहिती तंत्रज्ञान संचालनालय", या जोडण्या उपलब्ध करून देत आहे.

भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.

गोपनीयता धोरण

एक सर्वसाधारण नियम म्हणून हे संकेत स्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. हे पोर्टल तुमच्या भेटीच्या वेळा आणि सत्रप्रवेश अशा प्रकारच्या माहितीची, सांख्यिकीय हेतूसाठी (जसे इंटरनेट प्रोटोकॉल, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ इ.) नोंद घेते.

आम्ही या माहितीचा उपयोग तुमच्या वैयक्तिक भेटीची ओळख म्हणून ठेवत नाही. या संकेत स्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो. आम्ही उपयोगकर्ता किवा त्यांच्या ब्राउजिंग गतीविधीवर लक्ष ठेवत नाही.

महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलने तुमच्याकडून वैयक्तिक माहिती देण्याची मागणी केल्यास, ती कशाप्रकारे वापरली जाईल, हे तुम्हांला सांगितले जाईल, तसेच या माहितीची गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल.

कॉपीराइट धोरणे

या संकेत स्थळावरील माहिती संकलित केली गेली आहे. ती नि:शुल्कपणे कुठल्याही स्वरुपात किवा माध्यमात, कुठलीही विशिष्ट परवानगी न घेता पुनर्मुद्रित करता यईल. माहिती जशी आहे, तशी तंतोतंत वापरण्यात यावी. तसेच अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. जेव्हा या माहितीचे किवा सामग्रीचे प्रकाशन किवा वापर कराल त्या वेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे. ह्या संकेत स्थळावरील माहितीचे पुनर्मुद्रण करण्याची अनुमतीमध्ये या संकेत स्थळावरील माहितीचा विस्तार करू शकत नाही जे की त्रयस्थ पक्षाचे सर्वाधिकार धोरण म्हणून ओळखले जाते. या प्रकारच्या सामग्रीचे पुनर्मुद्रण करायच्या अधिकारासाठी सर्वाधिकार धोरण धारकाशी संपर्क साधावा.